शेतातली सर्वे कामे संपले की उन्हाळ्याची चाहूल लागते. की लगेच बायकांची लगबग चालू होते. उन्हाळी कामे करण्यासाठी महिला मंडळी तयारीला लागतात. ग्रामीण भागातील महिला गावरान पद्धतीने बनवलेली गव्हाची कुरडई च वापरतात. जुनी लोकं म्हणायचे की घरामध्ये लग्न वगैरे असलं की सर्वप्रथम वडे तोडावे. त्यामुळे लग्न लवकर जुळून येतात. त्याच प्रकारे उन्हाळी काम करायचे म्हटले की बायका सुरुवातीला वडे तोडतात. वड्यांना दुसरा शब्द आहे सांडगे. सांडगे तोडून उन्हाळी कामाला सुरुवात केली जाते. आणि महिला एकमेकींना खूप मदत करतात. की कशामध्ये मीठ कमी आहे, कशामध्ये जास्त आहे. आणि कशा प्रकारे करायचे हे एकमेकीला सांगत असतात. अशाप्रकारे उन्हाळा चालू झाला की बायकांची नुसती गडबड उठते. उन्हाळ काम करण्याची पापड, कुरडया आणि शेवया अशा प्रकारे अनेक प्रकारचे उन्हाळी काम बायकांचे चालू होतात.
चांगल्या प्रतीच्या गव्हाची निवड
कुरडया करायच्या म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे गहू बायका दुकानात शोधत असतात त्याच प्रकारे कुरडया कशा करायच्या त्याच्याबद्दल आपण आज थोडसं साधी आणि सोपी पद्धत जाणून घेऊया सर्वप्रथम कुरडया करताना चांगल्या प्रतीच्या गव्हाची निवड करावी लागते. आणि त्यांना कमीत कमी चार ते पाच दिवस भिजत ठेवावे लागतात व त्याच्या मध्ये तुरटी टाकावी लागते तुरटीमुळे चिकाला पांढरेपणा जास्त येतो नंतर चौथ्या दिवशी पाणी बदलावे लागते आणि पाचव्या दिवशी त्याला छानसं वाटून गाळून वगैरे एका डब्यामध्ये स्वच्छ कपड्याने गाळून ठेवावे लागते. वाटताना मशीन दोन खुर्च्यांच्या मधोमध येईल अशा पद्धतीने बांधून घ्यावी लागते. त्याला मधोमध फळी ठेवावी लागते नंतर दोन्ही बाजूने दोन व्यक्ती बसाव्या लागतात. एकाने मशीन फिरवावी लागते आणि दुसऱ्यांनी घास हळूहळू टाकावा लागतो. मशीन मधून घास जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस एका भांडे खाली ठेवावे लागते. त्याच्यामध्ये घास पडल्यानंतर एक जणांनी तो स्वच्छ धुऊन पिळून घ्यावं लागतो.
चीक हटण्याची पद्धत
नंतर दुसऱ्या दिवशी कुरडया करायला घ्याव्या लागतात. चीक हटावा लागतो तो हाटतानी घामाघुन अंग होते. चिक हटण्याअगोदर त्याला गॅसवर न ठेवता चुलीवर हटावा लागतो. पुन्हा त्याला विटा शोधाव्या लागतात. सहा विटाची चूल तयार करून त्यामध्ये लाकडे टाकून चूल पेटवावी लागते. नंतर त्याच्यावर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाणी तापवून घेऊन त्याला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये मीठ घालावे. आणि चीक त्याच्यामध्ये टाकावा लागतो. नंतर तो हटावा लागतो जे हटण्याचे साधन असते त्याला चाटू असे म्हटले जाते. चिक हटण्याकरिता कमीत कमी दोन महिला तरी लागतात. आणि दोन महिला पातेलं पकडण्यासाठी लागतात. चार महिला चिक हटण्यासाठी लागत असतात.
कुरडई बनवून झाल्यावर घ्यावयाची काळजी
अशाप्रकारे चीक हटला जाऊन त्यावर खूप लक्ष ठेवावे लागते. कुरडई करताना चिक खाण्याची मज्जा ही खूप काही वेगळीच असते. लहान लहान मुलं चिक खाण्यासाठी पुढे येतात. अशाप्रकारे कुरडई चा वेढा घालून झाल्यावर कुरडई दोन दिवस चांगली सुकवून ठेवावी. नंतर स्वच्छ डब्यामध्ये टाकून बंद करून ठेवावी लागते. ही कुरडई दोन वर्ष राहील अशी त्याची काळजी घ्यावी लागते.
स्वतः घरी बनविलेल्या कुरडई खाण्याची मज्जा काही औरच असते
कोंबड्या, बकऱ्या आणि इतर प्राण्यापासून सावध राहून त्याच्यावर दिवसभर लक्ष ठेवावे लागते. गावरान पद्धतीने बनवलेली गव्हाची कुरडई खाण्याची मज्जा मात्र वेगळीच असते. आपण कष्ट करून केलेली कुरडई खाताना आनंद मात्र तो वेगळाच असतो. अशाप्रकारे नंतर कॉटवर प्लास्टिकचा कागद अंथरावा लागतो. नंतर जोपर्यंत चीक गरम आहे तोपर्यंत सोऱ्यामध्ये घालून कुरडईचा वेढा घालावा लागतो. अशा प्रकारे कुरडई करण्याचे सोपी पद्धत आहे.
कुरडई बनवण्याची जुनी पद्धत
अशा प्रकारे कुरडई बनवण्याची सोपी पद्धत पहिली आहे. तर आपण याच्यामध्ये जुन्या बायका कशाप्रकारे कुरडई बनवून हे पाहूया. त्या आतापेक्षा जास्त मेहनत घेत होत्या. खूप कष्ट घेऊन त्या कशाप्रकारे कुरडई बनवत होत्या हे आपण थोडक्यात पाहूया.
जुन्या बायकांना खूप कष्ट घ्यावे लागत होते त्याकाळी मशीन बनवण्याचे यंत्र उपलब्ध नव्हते. त्यांना पाटा आणि वरवंटा याच्यावर भिजलेले गहू बारीक करावे लागत असे. गहू बारीक करताना बायकांचे हात घाण होत असे. त्याचा वास सुद्धा खूप येतो. बायकांच्या हाताचा वास दोन-तीन दिवस तरी कमीत कमी जात नाही तरीही बायका पाट्यावर मेहनत घेऊन गहू बारीक करत होत्या. आणि आत्ता मात्र मशीन वगैरे आली आहे तर बायकांना खूप सोप्या पद्धतीने कुरडई बनवता येते. जास्त मेहनत लागत नाही अशा प्रकारे हे कुरडई बनवण्याची सोपी आणि जुनी पद्धत आपण पाहिले आहे.