शेतकऱ्यांनो, १५ मे पर्यंत हे काम केले तरच मिळेल दोन हजारांचा हप्ता

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येत आहेत.

या योजनेचे वैशिष्टये

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. त्यानुसार वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. मात्र यातील काही शेतकरी आपल्या बँक खात्याशी आधार नंबर लिंक न केल्याने या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे भारतीय डाक विभागाने गावातच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खात्याशी आधार नंबर लिंक असणे आत्याआवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे आधार नंबर लिंक नसल्याने त्यांना योजनेचा फायदा मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात भारतीय डाक विभागात खाते उघडल्यावर त्या खात्याशी आधार लिंग करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच ज्या बँकेत खाते आहे त्या खात्याशी बँकेत जाऊन आधार नंबर लिंक करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मे महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे शेतकरी या लाभापासून वंचित आहेत त्यांनी १५ मे पर्यंत आपले बँक खाते आधार नंबरशी लिंक करून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक गावात केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येते. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबविण्याचे ठरविले आहे. मे महिन्याच्या शेवटी प्रधानमंत्री किसान योजनेसोबतच नमो योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना आता ६ हजार ऐवजी १२ हजार रुपये प्रति वर्षी मिळणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हवा असल्यास बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया न केल्याने बरेच शेतकरी या लाभांपासून वंचित आहेत.

आपल्या बँक खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कसे तपासावे

  1. त्याची पडताळणी करण्यासाठी यासंबंधीची अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर लॉगिन करा.
  2. त्याठिकाणी ‘Farmers Corner’ बटनवर क्लिक करा.
  3. Beneficiary Status’ बटणवर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडले जाईल.
  4. लाभार्थ्याचा आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक हा तपशील द्यावा लागेल.
  5. ‘Get Data’ बटनवर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी हप्त्यासंदर्भातील सद्यस्थितीत दिसेल.

बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काय करावे ?

तुमच्या बँक खात्यात पैसे येत असल्याचा एसएमएस तुम्हाला आला नसेल, तर तुमची ऑनलाइन स्थिती तपासा किंवा या नंबरवर संपर्क करा.

प्रधानमंत्री किसान टोल फ्री क्रमांक: १८००११५५२६६

प्रधानमंत्री किसान हेल्पलाइन क्रमांक: १५५२६१

प्रधानमंत्री किसान लँडलाइन क्रमांक: ०११—२३३८१०९२, २३३८२४०१

प्रधानमंत्री किसान नवीन हेल्पलाइन: ०११ – २४३००६०६

प्रधानमंत्री किसानची आणखी एक हेल्पलाइन: ०१२०-६०२५१०९

ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in

Leave a Comment