TDM Marathi Movie 2023 – Review, Cast and Trailer

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा TDM Marathi Movie. मराठी कलाकार जिद्दही आणि कष्टाळू आहेत. तो व्यवस्थेसमोर झुकत नाही झुकतो फक्त माय-बाप प्रेक्षेकांसमोर. या चित्रपटाला थिएटर मालकांनी प्राईम टाईम दिला पाहिजे होतो पण दिला नाही.

TDM चित्रपटाची पार्श्वभूमी

पूर्वी हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद पण दिला परंतु त्यानंतर चित्रपटाला योग्य प्रमाणात थिएटर मिळाले नाहीत म्हणून प्रेक्षकांची इच्छा असूनही चित्रपट पाहता आला नाही. यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि इतर कलाकार मंडळी नाराज होऊन पुढील चित्रपटांचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला.
गेले काही दिवस या चित्रपटाला थिएटर मिळत नव्हते अशी बातमी समोर आली होती.

TDM Marathi Movie Story

बाबू हा कष्टकरी तरुण आहे, साधे खेड्यातील जीवन जगतो. आजूबाजूचे लोक त्याला एक डरपोक, निरुपयोगी, आयुष्यभर गडबड करणारे समजतात. चित्रपटाच्या कालखंडात प्रेक्षकांच्या लक्षात येते की बाबूच्या साध्या मनाच्या वागणुकीत, एक अत्यंत महत्त्वाकांक्षी माणूस यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. पण त्याच्या संघर्षाला जशी फळे येऊ लागतात, तशीच संकटेही वाढतात.
जब जिंदगी झंड होती है तो पूना मुंबई याद आती है!!
TDM अशा जगावर प्रकाश टाकते ज्याकडे सिनेमाच्या चकचकीतपणा आणि ग्लॅमरमुळे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. ‘टीडीएम’ मधील व्यक्तींची स्वप्ने तुटपुंजी वाटत असली तरी ती वास्तवाची गुरुत्वाकर्षणे घेऊन जातात. भाऊराव कर्‍हाडे यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील कथा कथन करण्याची एक खासियत स्वत: तयार केली आहे.

नीलम: सरळ पाड ना सारं
बाबू: सारं सरळच आहेत तुझी नजर वाकडी आहे. तू जरा सरळ बघशील का
नीलम: बघतंय एकीकडे आणि चालतंय एकीकडे . . . . तुतारताणीत . . . .Hopless

TDM त्याच्या अंमलबजावणीमध्ये उंच आहे आणि त्यात काही अस्सल पात्र क्षण आहेत. पूर्वार्ध थोडासा ओढला तरी, तो पात्रांबद्दल एक विशिष्ट आवड निर्माण करतो. पृथ्वीराज थोरात प्रिय बाबू म्हणून हुशार आहेत. प्रेक्षक खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनात गुंतवलेले असतात आणि ते नक्कीच एखाद्याच्या हृदयावर खेचतात. चित्रपटाच्या उत्तरार्धात कालिंदी निस्ताने खरोखरच तिच्यात येते.
चित्रपट, अधोरेखित करताना, नक्कीच प्रेरणादायी आहे. हे अचानक संपते, परंतु बाबू-नीलमच्या कथेसाठी आणि कधीही न दिसणारे गावाचे आकर्षण अनुभवण्यासाठी ते पाहण्यासारखे आहे.

TDM Marathi Movie

भाऊराव कऱ्हाडे यांची माहिती

भाऊराव कर्‍हाडे हे मराठी चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांची ओळख आहे. भाऊराव कर्‍हाडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांचा जन्म २१ एप्रिल १९७६ रोजी झाला. त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून पदवी प्राप्त केली, जिथे त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला.

कर्‍हाडे यांनी २०१५ मध्ये “ख्वाडा” या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्याला समीक्षकांची प्रशंसा आणि अनेक पुरस्कार मिळाले. या चित्रपटात ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा मांडण्यात आला आहे. शेतकऱ्यांसमोरील आव्हाने आणि दुष्काळाचा त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम यांचे वास्तववादी चित्रण केल्याबद्दल त्याची प्रशंसा करण्यात आली. “ख्वाडा” च्या यशानंतर, कर्‍हाडे यांनी २०१७ मध्ये “कच्चा लिंबू” नावाचा आणखी एक मराठी चित्रपट दिग्दर्शित केला.

भाऊराव कऱ्हाडे यांनी बबन, ख्वाडा यासारखे अस्सल गावरान ढंगातील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणून आपली एक वेगळी ओळख चित्रपटश्रुष्टीत निर्माण केलेली आहे.

आता आपण जाणून घेऊया टीडीएम चित्रपट का पाहावा याचे काही ठोस मुद्दे

पृथ्वीराज आणि कालिंदी यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला TDM Marathi Movie नक्की कसा बनलाय याचा वेध आता आपण घेणार आहोत तर ही कथा फिरते बाबूच्या आयुष्यभोवती अगदी २४ वर्षाच्या या तरुणाची भूमिका अभिनेता पृथ्वीराज थोरात ने साकारले आहे. त्याच्या जोडीला आहे नीलम म्हणजेच कालिंदी. हा या दोघांचा पहिला सिनेमा या दोघांचा अभिनय पडद्यावर अत्यंत उत्तम झालेला आहे भाऊराव कऱ्हाडे यांचं हे कौशल्य आहे की नवे नवोदित कलांकरांकडून काम कसं करून घ्यायचं आणि ते कसं खुबीने सादर करायचे ही एक त्यांची कला आहे.

  1. नवोदित कलाकारांचा अभिनय आणि त्याचबरोबर लव्ह स्टोरी फुलवण्यासाठी गाण्यांचा सुंदर साज, Cinematography ही सर्वच पैलू चित्रपटाला उत्तम बनवतात विशेष कौतुक करावे लागते कलाकारांचं. सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांच्यामुळे या चित्रपटाची कथा अधिक उत्कृष्टपणे भरलेली आहे.
  2. ज्या काळात कथा घडते त्या काळातील सिच्युएशन पडद्यावर रेखाटताना दिग्दर्शकाला आलेले यश उल्लेखनीय आहे.
  3. शिरूर आणि नगर जिल्ह्यातील लोकजीवन, तिथली सर्वसामान्य परिस्थिती आणि सर्वसामान्य विचारसरणी यातील सगळ्याच बाबी चित्रपटांमध्ये उत्तमरीत्या मांडण्यात आलेल्या आहेत.
  4. १९९० च्या दशकात निखळ प्रेमाचा अनुभव कसा होता हे जर आपल्याला अनुभवायचे असेल तर चित्रपट नक्कीच पहावा. चित्रपटाचा क्लायमॅक्स काय गोष्टी रिव्हिल होतील हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच करतात.
  5. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आपल्यासमोर येते ते म्हणजे साधी आणि सुंदर कथा हे पाहताना यापैकी आपणच आहोत याचा आपल्याला भास होतो.

मान्यवरांचे मनोगत

सुप्रियाताई सुळे – सदस्या लोकसभा

सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक विडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे. त्यांची स्वतः हा सिनेमा अजितदादा सोबत पहिला असून प्रेक्षकांना सिनेमा पाहण्यासाठी आवाहन केले आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार ऋषी विलास काळे हे इंदापूर येथील रहिवाशी आहेत.

सुपर चित्रपट, संपूर्ण चित्रपट मनोरंजनीय आहे. चित्रपट पाहताना कंटाळा अजिबात येत नाही. कथा आणि गाणे भन्नाट !! – प्रेक्षक

ग्रामीण भागातील सुंदर प्रेमकथा आणि Superhit Music and Acting – प्रेक्षक

Super Hit – प्रेक्षक

TDM Marathi Movie Download

TDM चित्रपटातील कलाकार

दिग्दर्शक: भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
प्रोड्युसर: चित्राक्षा फिल्म्स इन असोसिएशन विथ स्माईल स्टोन स्टुडिओ
कलाकार: पृथ्वीराज थोरात, कालिंदी निस्ताने, भाऊराव कऱ्हाडे, रोहित मोरे, प्रभाकर मठापती, शीतल पाटील, संदीप साकोरे आणि ऋषी विलास काळे
Cinematography: वीरधवल पाटील
Edited by: पवन थेऊरकर, संकेत ज्योती अरविंद
संगीत: वैभव शिरोळे, रोहित नागभिडे आणि ओंकारस्वरूप बागडे
वितरक: UFO Movies
Visual Effects: महेश गडाख

शेवटी तुम्हाला मी एवढे सांगेन की हा चित्रपट तुम्हाला एकदा पाहायला हरकत नाही. आणि जर का आपण हा चित्रपट पाहिला असेल तर आपल्या प्रतिक्रिया येथे नक्की नोंदवा.

1 thought on “TDM Marathi Movie 2023 – Review, Cast and Trailer”

Leave a Comment