अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची माहिती, कार्य आणि इतिहास

अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चोंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे माणकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्या कुटुंबात झाला. माणकोजी शिंदे हे धनगर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व आणि गावाचे प्रमुख होते. त्याकाळात मुली शाळेत जाऊन शिक्षण जरी घेत नसल्यातरी माणकोजी शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांना घरीच शिक्षणाचे धडे दिले.

अहिल्याबाई आणि खंडेराव होळकर यांचा विवाह

Ahilyabai Khanderao Marriage
मल्हारराव होळकर हे आपल्या सैनिकांबरोबर पुणे येथे जात असताना चोंडी (जि. अहमदनगर) येथे मंदिरात थांबले होते. तेव्हा त्यांनी अहिल्याबाईला पहिले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे ८ वर्षाचे होते. धार्मिक, हुशार, चुणचुणीत, गुणी आणि चरित्रसंपन्न मुलगी पाहून मल्हारराव होळकर भारावले होते. त्यावेळी त्यांनी तिला आपली सून करून घ्यायचे मनामध्ये ठरवले. अवघ्या ८ वर्षाची असताना मल्हारराव होळकर यांचा १२ वर्षाचा शुरवीर मुलगा खंडेराव बरोबर अहिल्याबाईंचा विवाह २० मे १७३३ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे संपन्न झाला. आणि त्यांना माळवा राज्याची सून करून घेतले.

अहिल्याबाई होळकर आणि खंडेराव होळकर यांना २ मुले होती. त्यामध्ये मुलगा मालेराव होळकर यांचा जन्म १७४८ मध्ये झाला. तर त्यांच्या मुलीचे नाव हे मुक्ताबाई होते. अहिल्याबाई होळकर यांचा शासनकाळ हा मराठा साम्राजातला सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.

अहिल्याबाई होळकर यांच्या मुलाचा मृत्यू – Ahilyabai Holkar Son Death

मल्हारराव होळकर यांचे १७६६ मध्ये मृत्यू झाला. त्याच्या पुढच्या वर्षी मुलगा मालेराव होळकर यांचे निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुःख त्यांनी लोकांना दिसू दिले नाही. राज्याचे आणि लोकांचे हित लक्षात घेऊन त्यांनी पेशव्याला माळव्याचा राज्यकारभार स्वीकारण्याची विनंती केली. काही लोकांनी यावर आक्षेप घेतला, तरी सैनिकी आणि प्रशासकीय कामामध्ये त्या उत्तम प्रारंगत असल्याने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. लष्कराचा देखील तिला पाठिंबा होता. अनेक बिकट प्रसंगी तिने सैन्याचे आघाडीतून नेतृत्व केले आणि खऱ्या योद्ध्याप्रमाणे लढले. १७६७ मध्ये पेशव्यांनी अहिल्याबाईंना माळवा ताब्यात घेण्याची परवानगी दिली.

त्या ११ डिसेंबर १७६७ रोजी सिंहासनावर आरूढ झाल्या आणि इंदूरच्या शासक बनल्या. पुढील २८ वर्षे महाराणी अहिल्याबाईंनी माळव्यावर न्याय्य, शहाणपण आणि ज्ञानी नीतीने राज्य केले. अहिल्याबाईंच्या राजवटीत, माळव्याला शांतता, समृद्धी आणि स्थिरता लाभली. आणि त्यांची राजधानी महेश्वर साहित्यिक, संगीत, कलात्मक आणि औद्योगिक व्यवसायांचे मरुद्यान बनले. कवी, कलाकार, शिल्पकार आणि विद्वानांचे तिच्या राज्यात स्वागत झाले कारण तिने त्यांचे कार्य उच्च आदराने ठेवले होते.

आद्य प्रवर्तक आणि हिंदू मंदिराच्या निर्मात्या – Ahilyabai Holkar Temple

अहिल्याबाई होळकर यांची महान आद्य प्रवर्तक आणि हिंदू मंदिराच्या निर्मात्या म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये मंदिरे, नद्यांचे घाट आणि धर्मशाळा चांगल्या पद्धतीच्या बांधल्या. ज्या गावांचा पाण्याचा प्रश्न होता तिथे त्यांनी विहिरी, बारवा यांची निर्मिती करून पाण्याच्या प्रश्न संपवला. मुघल सम्राट औरंगजेब यानी अपवित्र केलेले, उद्धवस्थ केलेले आणि पडलेल्या हिंदूंच्या पवित्र मंदिरांचं त्यांनी नूतनीकरून करून त्यांचा उद्धार केला. १७८० मध्ये प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचे नूतनीकरण आणि दुरुस्ती यामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे.

त्यांनी नेहमीच आपले राज्य मुस्लिम आक्रमकांपासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. युद्धाच्या वेळी त्या स्वतः सैन्यात सामील होऊन लढत असे. त्यांनी तुकोजीराव होळकरांना आपल्या सैन्याचा सेनापती म्हणून नेमले. राणी अहिल्याबाईंनीही तिच्या साम्राज्यात महेश्वर आणि इंदूरमध्ये अनेक मंदिरे बांधली होती.

धैर्य, कौशल्य आणि दूरदृष्टी – Ahilyabai Holkar Work and Vision

Ahilya Fort
अहिल्याबाई होळकर याना भारतातील सर्वात दूरदृष्टी महिला राणी पैकी एक मानले जाते. हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार दूरपर्यंत पोहचवण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यांनी औद्योगिकीकरणाचा प्रचार करण्यावर भर दिला. इंदूर आणि बऱ्याच भागात त्यांनी प्रोच्छाहन केलेल्या साडी व्यवसाय प्रसिद्ध आणि जोमात आहे. आतापण त्यांना शहाणपण, धैर्य आणि प्रशासकीय कामासाठी ओळखले जाते. अहिल्या किल्ला नर्मदा नदीच्या काठावर १८ व्या शतकात बांधला गेला.

सतीची प्रथा

१७५४ मध्ये युद्धादरम्यान खंडेराव होळकर पालखीमधून सैनिकांची पाहणी करताना जाट सैनिकांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आणि या गोळीबारात गंभीर जखमी होऊन खंडेरावांच्या यामध्ये मृत्यू झाला. खंडेरावच्या निधनानंतर अहिल्याबाईला खूपच दुःख झाले आणि त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. पूर्वी पतीच्या निधनानंतर पत्नीला सती जाण्याची प्रथा होती परंतु तिच्या सासरच्यांनी तिला सती जाण्यापासून रोखले. पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सैनिकी, लष्करी आणि राज्यकारभाराचे शिक्षण देऊन प्रारंगत केले.

अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) आणि श्री क्षेत्र जेजुरी गड

श्री क्षेत्र जेजुरी गडाच्या विकास कामात अनेक राजघरांचा खूप मोलाचे सहकार्य होते. यामध्ये फक्त इंदूर च्या श्रीमंत होळकर घराण्याचा सिंहाचा वाटा आहे. जेजुरीचा खंडेराय हे होळकर घराण्याचे कुलदैवत आहे असे काही ठिकाणी नोंद आहे. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी गडावरील दगडी कमानीचे आणि नंतर नगारखान्याचे काम पूर्ण केले. अश्या आशयाचे होळकर कालीन २ शिलालेख गडावर आता आहेत. असे बरेच समाजोपयोगी कामे त्यांनी जेजुरी गडावर केले आहेत असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो.

अहिल्याबाई होळकर – मृत्यू – Ahilyabai Holkar Died

यांचा मृत्यू वयाच्या ७० वर्षी म्हणजेच १३ ऑगस्ट १७९५ रोजी मध्य प्रदेशातील महेश्वर येथे झाला. त्यांचा वारसा अजूनही चालू आहे. विविध मंदिरे, धर्मशाळा, नद्यांचे घाट आणि सामाजिक कार्य याची साक्ष देतात. त्यांनी राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी योगदान दिले आहे आणि त्यांना भारतीय इतिहासातील एक उल्लेखनीय राणी आणि महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून स्मरण केले जाते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर – Punyashlok Ahilyabai Holkar University Solapur

पूर्वी याचे नाव “सोलापूर विद्यापीठ” असे होते. याची सुरुवात १ ऑगस्ट २००४ रोजी झाली. धनगर समाजाकडून या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ करावे अशी मागणी होती. ६ मार्च २०१९ ला याचे नामांतरण झाले. २००४ साली स्थापन झालेले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, आणि सामाजिक विज्ञान यासारख्या क्षेत्रात पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट कार्यक्रम देते. संशोधन, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.

अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या कर्तृत्वाचा सन्मान

Honor
भारत सरकारने २५ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक तिकीट जारी केले. राज्यकर्त्यांना श्रद्धांजली म्हणून इंदूरच्या देशांतर्गत विमानतळाला देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, इंदोर (Devi Ahilyabai Holkar International Airport, Indore MP) असे नाव देण्यात आले आहे. इंदूर विद्यापीठाचेही नामकरण देवी अहिल्याबाई होळकर विद्यापीठ असे करण्यात आले.

त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून “पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर” करावे असे सर्व स्थरातून मागणीला जोर धरू लागला आहे. हे नामांतर लवकर व्हावे हीच महाराष्ट्राकडून त्यांना खरी आदरांजली असेल.

FAQs

प्रश्न : अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कुठे झाला?
उत्तर: अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चोंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे शिंदे यांच्या कुटुंबात झाला.

प्रश्न: अहिल्याबाई होळकर कोण होत्या?
उत्तर: अहिल्याबाई होळकर या माळव्याच्या राज्याच्या राणी आणि प्रसिद्ध शासक होत्या.

प्रश्न: अहिल्याबाई होळकर माळव्याच्या राज्यकर्त्या कधी झाल्या?
उत्तर: राणी अहिल्याबाई त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर माळव्याच्या राज्यकर्त्या झाल्या.

1 thought on “अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची माहिती, कार्य आणि इतिहास”

Leave a Comment