महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याना आता राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे. म्हणून राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. २०२३-२०२४ वर्षीय अर्थसंकल्पात राज्य सरकारने याची घोषणा केली होती. प्रत्येक शेतकऱ्याला येत्या खरीप हंगामापासून या पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली. परंतु याचा अध्यादेश अद्याप कृषी विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिक विमा

राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आणली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना केवळ १ रुपयामध्ये पिक विमा मिळणार आहे. राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा या नावाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा केवळ एक रुपयांत उतरविता येणार आहे. मात्र या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार, नैसर्गिक आपत्ती किंवा अवकाळी पावसाने पिकांचे किती नुकसान झाले, त्या नुकसानीची माहिती किती दिवसात आणि कोणाकडे द्यावी लागणार आहे, विम्याची रक्कम किती मिळणार, याबाबतच्या सूचना किंवा नियम अद्यापही कृषी खात्याकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या योजनेचे नियम, पात्रता आणि त्यातून मिळणारे लाभ, याबाबतची माहिती ही अध्यादेश मिळाल्यानंतरच कळू शकणार आहे.

आधीच्या योजनेत पिक विमा च्या हप्त्याच्या दोन टक्के रक्कम घेतली जायचे

ही योजना पूर्वी महाराष्ट्रात लागू होती पण या योजनेमधून शेतकऱ्यांकडून एकूण विमा हप्त्याच्या २ टक्के रक्कम घेतली जायची. आता ती रक्कम फक्त एक रुपयावर आली आहे. आता हा भार शेतकऱ्यावर न ठेवता राज्य सरकार उचलणार आहे.

मात्र यापुढे शेतकऱ्यांचा कोणताच भाग राहणार नाही
या योजनेमध्ये कुठलेहि अतिरिक्त छुपे चार्जे नसणार असून शेतकऱ्यांवर कुठलाच अतिरिक्त भार राहणार नाही. याची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम किसान पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

राज्य सरकार भरणार शेतकऱ्यांचा हप्ता

Crop Insurance in One Rupees
राज्य सरकार या योजनेतील १ रुपया फक्त शेतकऱ्यांकडून भरून इतर अतिरिक्त जो भार आहे हा शेतकऱ्यांवर न टाकता राज्य सरकार अतिरिक्त भाराचे पैसे हे पीक विमा कंपन्यांना देणार आहे. विमा हप्ता भरण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा

शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब असून यामध्ये शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. आणि केवळ १ रुपया भरून आपला पिक विमा घेता येणार आहे. राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे.

राज्य सरकार उचलणार ३३१२ कोटी रुपयांचा भार

या पिक विमा योजनेमुळे राज्य सरकारवर ३३१२ कोटी रुपयांचा अतिरिक्त भाग पडणार असून प्रत्येक वर्षी ही किंमत राज्य सरकार आपल्या तिजोरीतून शेतकऱ्यांसाठी देणार आहे. या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यावर विशेष भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकारने हा पहिलाच अर्थसंकल्प सादर केला.

पीकविमा भरण्यासाठी केंद्रामध्ये होणारी धावपळ आता थांबणार

यामुळे शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबणार आहे. याच्या अगोदर कुठलाही पीकविमा भरायचा असेल तर बळीराजा CSC सेंटर मध्ये जात होते आणि तिथे फॉर्म भरण्यासाठी त्यांना चार्जे द्यावा लागत असे. आता हे थांबणार असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

शेतकरी बांधवांना विनंती आहे कि ही महत्त्वाची योजना तुमच्या शेतकरी बांधवाना देखील शेअर करा. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.

राज्य सरकारचा एकच ध्यास बळीराजाचा विकास

शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून सरकारचा सध्या एकच धोरण आहे. गेल्या काही काळापासून शेती आणि शेतकरी संकटात आहे. पीकविमा भरूनही बळीराजाला त्याचा लाभ मिळत न्हवता. याच्यावर शिंदे-फडणवीस सरकारने चांगला तोडगा काढला आहे.

सरकारचा एकच ध्यास बळीराजाचा विकास!!

1 thought on “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा”

Leave a Comment