गावची यात्रा – Gavachi Yatra

गावची यात्रा (Gavachi Yatra) म्हटलं कि जसा एक वेगळाच उत्साह आणि आतुरता सर्वांच्या मनात असते तसाच उत्साह आणि एक आनंद आपल्या मनात असतो. कधी एकदा गावच्या यात्रेचा दिवस उजाडतो. यात्रेसाठी शहरात किंवा नोकरीच्या ठिकाणावरून गावातला प्रत्येकजण जमा होतो. तसेच माहेरवासीन्या आपल्या मुलांबरोबर यात्रेसाठी आणि उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी आलेली असती.
गावात सर्वांच्याच घरी यात्रेसाठी भरपूर पाहुणे पुणे, मुंबई तसेच इतर शहरातून आलेले असतात. गावच्या यात्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांना भेटतात त्यामुळे एक आपुलकीची भावना सर्वांच्याच मनात निर्माण होते आणि विचारांची देवाण-घेवाण सुद्धा होते.

यात्रेच्या २ दिवस गाव पूर्णपणे आनंदी आणि उच्छाही दिसते. दिवसभर गावात गजबज आणि लगबग असते. यात्रा हि कडक उन्हाळ्यात जरी असली तरी उन्हाची कोणीच पर्वा करीत नाही.

गावची यात्रा (Gavachi Yatra) आणि कावडी हे एक वेगळंच नातं असत

गावची यात्रा (Gavachi Yatra)

यात्रेच्या अगोदर एक आठवडा गावातील काही तरुण मुले हे पैठण ला गोदावरी नदीतून पाणी आणण्यासाठी जातात. गोदावरी नदीचे पाणी पवित्र मानले जाते. तेथून सर्व मुले पाणी आपल्याबरोबर आणलेल्या कळशीमध्ये खांद्यावर घेऊन निघतात. ते पाणी घेऊन बिगर चप्पलने अनवाणी आठवडाभर चालत असतात. (याला कावड असे बोलले जाते ) यात्रेच्या दिवशी सकाळी गावाच्या कडेला नदीवर पोहचतात. तेथून गावकरी त्यांची पूजा करून गावातील मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून घेऊन येतात. नंतर ते सर्वे तरुण मुले गावातील भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर आणि इतर मंदिरात ते पाणी अर्पण करतात. ही प्रथा खूप दिवसापासून चालत आलेली आहे. हे कधी चालू झाले हे कोणीच सांगू शकत नाही. उलट तरुण मुले आणि इच्छुक आवडीने पाणी आणण्यासाठी पैठण ला जात असतात.

दिवसभर मंदिर परिसरात छोटे छोटे व्यावसायिक खेळणी, भजे, वडा पाव, आणि गोड मिठाईचे दुकाने लावतात. याचबरोबर शेतातील कलिंगड, खरबूज आणि द्राक्षे शेतकरी विकायला बसलेले असतात. यामध्ये तरुणामध्ये खास आकर्षण असते ते सोरटीचे आणि गुडगुडीचे. सोरटी आणि गुडगुडी हा खेळ पैश्यावर खेळला जातो.

पालखी मिरवणूक (छबिना)

श्री भैरवनाथ पालखी मिरवणूक हि रात्री ९ वाजता निघते याला छबिना असे म्हणतात. छबिना पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी गावातील सर्वे गावकरी आणि पाहुणे मंडळी मंदिरासमोर जमा होतात. पालखी मिरवणूक रात्री अंदाजे १ पर्यंत चालू असते. गावातील जुने जाणते वयस्कर लोक ढोल, ताशा आणि लेझीम पालखीसमोर वाजवतात. तरुण आणि वयस्कर मंडळी ढोल, ताश्याच्या संगीतावर नाचून मनमुराद आनंद लुटतात. यामध्ये ढोल, ताशा आणि लेझीम अशा पारंपरिक वाद्यांबरोबर डी जे आणि बँड यांचा पण सगभाग असतो. अश्याप्रकारे पालखी मंदिराला वाजतगाजत गोल फिरवून परत मंदिरामध्ये विधिवत पूजा करून ठेवली जाते.

गावची यात्रा आणि जंगी कुस्त्यांचा आखाडा

कुस्तीसाठी ताकद, चपळता, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असते. हे गुणधर्म विकसित करण्यासाठी आणि त्यांची तंत्रे सुधारण्यासाठी पैलवाणांना मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागते. कुस्ती हा केवळ एक खेळ नाही तर मनोरंजनाचा एक प्रकार आहे. ग्रामीण भागात कुस्ती हा प्रतिष्ठेचा खेळ समजला जातो. ग्रामीण भागात प्रत्येक घरात शक्यतो एक तरी पैलवान असतोच.
कुस्त्यांच्या आखाड्यात दोन तीन तालुक्यातील नावाजलेले पैलवान आणि कुस्ती शौकीन हे हजेरी लावतात आणि कुस्त्यांचा आनंद लुटतात. पूर्वी लहान मुलांच्या कुस्त्या ह्या रेवड्या वर लावल्या जायच्या पण आता पैश्यावर लावल्या जातात.
आणि शेवट हा श्री भैरवनाथाचे चांगभले करून यात्रेची सांगता केली जाते.

करमणूक (सांस्कृतिक कार्यक्रम)

करमणूक (सांस्कृतिक कार्यक्रम)

सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील सर्व लहान थोर मंडळी हजर असतात. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त असते. गावच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हागामा संपल्यानंतर रात्री करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता. प्रत्येक वर्षी यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातात. कधी तमाशा तर कधी लावणीचे कार्यक्रम गावकऱ्यासाठी ठेवलेले असतात. महाराष्ट्राची लोकधारा असे या कार्यक्रमाचे नाव असून या मध्ये विविध प्रकारचे लोकगीते, लावण्या, पोवाडे आणि मराठी आणि हिंदी गाणे सादर केले गेले. अशाप्रकारे सगळे गावकरी या कार्यक्रमाचा आनंद लुटतात. आणि २ दिवसाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी यात्रा संपते.

अश्या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच, सांस्कृतिक देवाणघेवाण होते. ग्रामीण समुदायाच्या संगीत परंपरा साजरे करण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा सामूहिक प्रयत्न. हे वाद्यवृंद सांस्कृतिक ओळख जिवंत ठेवण्यात. आणि गावकऱ्यांमध्ये अभिमान आणि एकतेची भावना वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

आणि अश्याप्रकारे सर्वे मंडळी पुढच्या वर्षीच्या यात्रेची मनात उच्छुकता ठेवून आप-आपल्या काम-धंद्यावर रुजू होतात.

2 thoughts on “गावची यात्रा – Gavachi Yatra”

Leave a Comment