हॉस्टेल आणि एका बापाच्या मनातील घालमेल | Hostel – Father and Son

बाप म्हटलं की कडक, शिस्तप्रिय, रागीट आणि असंवेदनशील प्राणी. मुलांबद्दल त्याच्या मनात प्रेम नाही. अशी प्रतिमा तयार झाली आहे. पण खरा बाप असा नसतो तो फणसाच्या गरा सारखा असतो. फणसाचा गर जसा आतमध्ये गोड आणि खाण्यासाठी चविष्ट असतो आणि बाहेरून कडक त्याच प्रकारे बाप असतो. बापाला मुलांबद्दल त्याच्या मनात खरंच प्रेम असते. पण तो ते प्रेम दाखवत नाही, तो खूपच हळवा आणि संवेदनशील असतो. तो आपलं मन कधीच मुलांसमोर आणि आपल्या कुटुंबासमोर व्यक्त करत नाही.

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याकडे कटाक्षाने लक्ष

मुलांनी नेहमी सुसंस्कृत आणि सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना कसे असावे आणि सर्वांबरोबर मन मिसळून राहावे हीच भावना नेहमी त्याच्या मनात असते

मुलांच्या भविष्याबद्दल तो नेहमीच विचार करत असतो. मुलांचे शिक्षण, त्यांचं करिअर त्याबद्दल नेहमीच त्याच्या मनात विचारांचे गोंधळ असतात. मुलांचे शालेय जीवन संपल्यानंतर त्यांच्या करिअरमध्ये त्यांना मार्गदर्शन करताना त्याच्या मनाचा अक्षरशः गोंधळ उडालेला असतो. मुलांनी काय करावे, काय करू नये, याचबरोबर त्याला त्याच्या मुलांच्या मनाचा पण विचार करावा लागतो. की मुलांना आत्ता काय हवंय काय नकोय.

एका आठवड्याच्या तयारीनंतर तो दिवस उजाडतो. आणि बाप हा आपल्या मुलाला घेऊन त्याच्या भविष्याच्या दृष्टीने त्याच्या चांगल्या करिअरच्या उद्देशाने मुलाने निवडलेल्या ठिकाणी मार्गक्रमण करीत पोहोचतो. मुलांच्या शालेय जीवनानंतर त्यांना खूप काही अशा करिअरच्या वाटा या जगामध्ये उपलब्ध आहेत. त्याच करिअर मधील एक वाट निवडून बाप हा आपल्या मुलाला त्याच्या करिअरला साथ देण्यासाठी तयार होतो.

दिवसभर वन-वन आणि पायपीट

आपल्या राहत्या घरापासून ३००-४०० किलोमीटरवर मुलांच्या करिअरसाठी नवीन शहरात बाप मुलाला घेऊन येतो. आणि तिथे खरी वन-वन, फरकट आणि त्याची भटकंती चालू होते. मुलाला राहण्यासाठी चांगली व्यवस्था मिळते का?. चांगला होस्टेल मिळते का? चांगली रूम मिळते का? चांगले त्याला रूममेट किंवा त्याचे सहकारी त्याला मिळतील का? ह्या आणि अशा पद्धतीचे एक आणि असंख्य प्रश्न बापाच्या मनात उभे राहिलेले असतात. आपला मुलगा हा पहिल्यांदाच आपलं घर सोडून नवीन शहरात दूर अशा ठिकाणी आपल्या पुढील आयुष्यासाठी आपल्या जीवनातल्या शिक्षणासाठी तो गेलेला असतो. त्याला जेवणासाठी चांगली मेस मिळते का? तिथे जेवणाची चव कशी आहे? आपल्या मुलाला जेवण आवडेल का?

आपल्या मुलाला घरी त्याच्या आईच्या हातचे जेवणाची गेले १५-१६ वर्ष सवय झालेली असते. आता तो नवीन शहरात नवीन ठिकाणी त्याला मेसचे जेवण हे आवडेल का? सगळ्या भाज्या त्याला आवडतील का? या आणि अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात घर केलेलं असतं. आणि त्याच्या मनात एक वेगळंच काहूर माजलेल असतं की आपला पोटचा गोळा हा काही दिवसांसाठी काही वर्षासाठी किंवा आयुष्यातील त्याच्या प्रगतीच्या दृष्टीने माझ्यापासून त्याला मी सोडत आहे.

आणि दिवसभराच्या कडकडीत उन्हात पायपटीनंतर एक चांगलं होस्टेल, एक चांगली मेस याचं नियोजन करून बाप हा आपल्या मुलाला त्याच्या होस्टेलला सोडण्याच्या तयारीत असताना, इथून पुढे खरं बापाच्या मनाचा बांध फुटलेला असतो. त्याला आपल्या मुलाला सोडताना त्याच्या मनात जे काहूर दाटले असते हे कोणीच शब्दात वर्णन करू शकत नाही. मुलाला समजून सांगता सांगता बापाचा कंठ दाटलेला असतो आणि त्याच्या डोळ्यातून कधी अश्रुधारा गळतात हे त्याला पण कळत नाही. त्याचे डोळे पाण्याने डबडबले असतात तो मुलाकडे पाठ करून आपल्या हाताने आपले डोळे पुसतो आणि परत मुलाला काही गोष्टी समजावून सांगतो.

शेवटचा क्षण आणि मनाची घालमेल

शेवटी बापाच्या मनात विचारांचे काहूर माजलेलं असतं आणि हा शेवटचा क्षण असतो. जेव्हा त्याची आणि त्याच्या मुलाची ही भेटीची शेवटची वेळ असते. निघण्यापूर्वी बाप मुलाला कडकडून मिठी मारून परतीच्या मार्गाला निघाला असतो. त्याच्या डोळ्यातील पाणी हे थांबतच नव्हते. आपल्या पोटच्या गोळ्याला सोडून, मनात फक्त एकच खूनघाट बांधून बाप निघतो की मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावे, पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने समाजात वावरताना किंवा मित्रमंडळीमध्ये वावरताना व्यवस्थित राहावे.

1 thought on “हॉस्टेल आणि एका बापाच्या मनातील घालमेल | Hostel – Father and Son”

Leave a Comment