वासोटा किल्ला (Vasota Fort) जंगल ट्रेक – Vasota Fort Jungle Trek

खूप दिवसानंतर तो दिवस उगवला. आणि रात्री १०:२० वाजता सगळी तयारी आणि आवरा आवारी केल्यानांतर प्रवासाला सुरुवात झाली. पुण्यातून (सारसबागेजवळून) बस पकडली. पुणे – सातारा – कास पठार – बामणोली येथे रात्री २:३० बस पोहचली. थंडीचे दिवस असूनसुद्धा थंडी जास्त नव्हती. बामणोली हे वासोटा किल्ल्यावर (Vasota Fort) जाण्यासाठी बेस गाव आहे. कोयना धरणाच्या बॅकवॉटर ला लागून “त्रिवेणी संगम ऍग्रो टूरीझम” च्या रिसॉर्ट वर छान, सुंदर असा छोट्याशा रूम मध्ये रात्री झोप कधी लागली ते कळलेच नाही.

वासोटा किल्ला (Vasota Fort) हे ट्रेकरसाठी लोकप्रिय असे ठिकाण आहे. या ट्रेकची सुरुवात बामणोली गावापासून सुरुवात होते. या ट्रेकमध्ये बोटिंग, घनदाट जंगले आणि खडकाळ खडकांमधून मध्यम ते कठीण चढाईचा समावेश होतो. या किल्याची उंची ४२६७ फूट आहे.

वासोटा किल्ला (Vasota Fort) – गुलाबी आणि धुक्याची पहाट

Vasota Fog in Morning
रात्रीच्या प्रवासानंतर पहाटे ५:३० ला ट्रेकर्सच्या टीम लीडर ने सगळयांना उठवून तयारी करायला सांगितली. पहाटे सगळीकडे छानशी अशी धुक्याची चादर पसरली होती. रिसॉर्ट धुक्यामध्ये हरवले होते. सकाळचे सगळे प्रातविधी आटोपून सगळे मेंबर्स तयारी करून नास्ता आणि चहा साठी एकत्र जमा झाले. गरमा गरम पोह्यावर मस्त ताव मारून झाल्यावर सगळे ग्रुप मेंबर्स कोयना धरणाच्या बॅकवॉटर च्या कडेला एकत्र जमा झाले. येथे ट्रेकर्स च्या टीम लीड्स कडून काही महत्वाच्या टिप्स आणि माहिती दिली गेली. कोयना धरण आणि आसपासचा सगळा परिसर याबद्दल थोडी माहिती दिली. सगळ्या ग्रुप मेंबर्स कडून स्वतःबद्दल, व्यवसायाबद्दल आणि आवडीविषयी माहिती घेतली गेली. ग्रुप फोटोज, विडिओ शूटिंग, सेल्फी झाल्यानंतर ग्रुप २ गटात विभागाला गेला. एवढे चालू असताना आमच्या सारथी (बोटी) किनाऱ्यावर तयार होत्या.

कोयना धरणाच्या पाण्यातील रोमांचिक प्रवास

Koyana Backwater
बोटींच्या जवळ जवळ जाताना हळू हळू “ठक ठक” येणारा आवाज आता जोराचा येऊ लागला. थोडं पाणी आणि चिखलामधून ४-५ पाऊल टाकताच बोटीची शिडी आली आणि त्याचबरोबर बोटीमध्ये शानदार प्रवेश. बोटीमध्ये जेव्हा एक एक जण प्रवेश करतो तेव्हा बोट छानशी छोट्या छोट्या लाटेवर हेलकावे खात होती. एका बोटी मध्ये १२-१५ जणच बसू शकतात तसा वन विभागाचा नियमच आहे. बोटी मध्ये सगळे ग्रुप मेंबर बसल्यानंतर बोट हळू हळू वासोटा किल्ल्याच्या दिशेने कोयना धरणाच्या अथांग असा जलसागरामधून मार्गक्रमण करू लागली. बोट पाण्यामध्ये वेडी वाकडे वळणे घेत पुढे पुढे जात होती. आणि खरंच इथेच आपल्याला सह्याद्रीच्या अथांग पसरलेल्या डोंगर रांगांचे निसर्ग सौदय अनुभवता येते. हा प्रवास असाच १ तास निसर्ग सौंदर्य डोळयात आणि मोबाईल मध्ये साठवत किनाऱ्यावर पोहचतो. हा सगळा अनुभव रोमांचकारी आणि नवीन होता.

आणि आता खरा रोमांच चालू झाला

Vasota Jungle Trek

१ तासाचा बोटीतून प्रवास केल्यानंतर बोटी किनाऱ्यावर विसावतात. वनविभागाच्या सर्व परवानगीनंतर आणि त्यांचे नियम वाचून खरा पायी प्रवास चालू होतो. दोन्ही बाजूला घनदाट जंगल आणि दोन्ही बाजूच्या उंच अश्या झाडांमधुन छोटीशी पाऊलवाट, अंगाला बोचणारा गार गार वारा, पाठीमागे लांबवर पसरलेला अथांग कोयनेचा निळाशार परिसर, त्यावर स्वार होऊन पळणार्‍या लाँन्चमधून सुखकर प्रवास, रस्त्यात गडाचे रक्षक मारुती आणि गणपती बाप्पा, आकाशाला गवसणी घालणारे अवाढव्य वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, त्यांच्यावर वास्तव करणारे अनेक रंगीबेरंगी पक्षी आणि त्यांचा किलबिलाट, प्रवेशद्वारातून गडावर जाताच चपटेदान मारुती रायाची मनमोहक मूर्ती, पुढे देवाधिदेव महादेवाचे उत्तर – दक्षिण दरवाजा असलेले पुरातन रमणीय मंदिर, समोरुन दिसणारा कोकणाचा प्रचंड आणि देखणा परिसर त्यातून डोकावणारा चुन्याचा घाणा, थंडगार पाण्याची टाकी आणी उलट्या शिट्या मारणारा बाबू कडा. जागोजागी वानर सेनेने हसतमुख केलेले स्वागत कधीच विसरू शकत नाही. सर्व काही अद्भुत आणि अविस्मरणीय!!

२ तास गडावर फिरल्यानंतर बरोबर आणलेल्या जेवणावर मारलेला ताव. वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो काढल्यानंतर खाली उतरण्याचा प्रवास चालू होतो.

बोटींमधून उतरून संपूर्ण वासोटा किल्ला जंगलामधून फिरत पाहून परत बोटीजवळ पोहचेपर्यंत चा प्रवास हा थरारक रोमांचिक करणारा आहे.

वासोटा किल्ला अडचण पातळी

ह्या किल्ल्याची चढाई वयक्तिक शारीरिक क्षमता आणि आधीच्या ट्रेकिंगच्या अनुभवावर अवलंबून आहे. हा ट्रेक मध्यम ते कठीण समजला जातो. किल्याच्या माथ्यावर पोहचायला ४-५ तास लागू शकतात. हि वेळ प्रत्येकाच्या चालण्यावर बदलू शकते. किल्यावर चढण्यासाठी स्थानिक मार्गदर्शकाची गरज लागते आणि बिगर मार्गदर्शकाशिवाय किल्यावर शकतो जाऊ नका.

वासोटा किल्ल्याबद्दलचे काही महत्त्वाचे तपशील

वासोटा किल्ला (Vasota Fort) हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत असलेला एक डोंगरी किल्ला आहे. किल्ल्याबद्दलचे काही महत्त्वाचे तपशील येथे आहेत.

इतिहास: हा किल्ला शिलाहार घराण्याने १२व्या शतकात बांधला होता आणि नंतर १७व्या शतकात मराठा साम्राज्याने तो ताब्यात घेतला होता. अनेक लढाया आणि युद्धांदरम्यान याचा उपयोग मोक्याचा किल्ला म्हणून केला गेला.

स्थान: हा किल्ला कोयना वन्यजीव अभयारण्याजवळ स्थित आहे आणि आजूबाजूच्या टेकड्या आणि कोयना धरणाच्या मागच्या पाण्याचे विस्मयकारक दृश्य देते.

ट्रेकिंग: वासोटा किल्ला हे ट्रेकिंगचे लोकप्रिय ठिकाण आहे, या ट्रेकची सुरुवात बामणोलीच्या पायथ्याशी होते. या ट्रेकमध्ये घनदाट जंगले आणि खडकाळ खडकांमधून मध्यम ते कठीण चढाईचा समावेश होतो. छत्रपती शिवाजी महाराजानी या किल्याला व्याघ्रगड असे नाव दिले आहे.

स्थापत्य: हा किल्ला एका अरुंद जमिनीवर बांधला गेला आहे आणि तीन बाजूंनी उंच थेंबाने वेढलेला आहे. यात अनेक प्रवेशद्वार, बुरुज आणि टेहळणी बुरूज आहेत आणि या प्रदेशातील मध्ययुगीन लष्करी वास्तुकलाची झलक देते. सध्या किल्याची स्थिती चांगली आहे.

वन्यजीव: किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्या, अस्वल, हरीण आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजातींसह अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे निवासस्थान आहे. हा किल्ला वनदुर्ग प्रकारात मोडला जातो. किल्यावर जाताना खूप काळजी घ्यावी लागते. शक्यतो गटामध्ये चढाई केलेली सर्वात योग्य.

प्रवेशयोग्यता: बामणोली गावातून बोटीने किंवा जंगलातून ट्रेकिंग करून किल्ल्यावर जाता येते. सर्वात जवळचे शहर सातारा आहे, जे अंदाजे ७० किमी अंतरावर आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर येथे भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे.

वासोटा किल्ल्याला भेट दिल्यास सह्याद्रीच्या पर्वतराजीच्या समृद्ध इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची झलक मिळते. किल्ल्यावर ट्रेकिंग हा साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी एक रोमांचकारी आणि ऊर्जा वाढवणारा अनुभव आहे.

Leave a Comment